आगरकरांचा जातिविचार भास्कर
आगरकरांनी आपल्या लिखाणातून कौटुंबिक सुधारणांवर अधिक भर दिला असला तरी काही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नही हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मणी परंपरेतील अन्य सुधारकांपेक्षा अधिक साक्षेपाने त्यांनी त्यांचा ऊहापोह केला आहे. हिंदु समाजातील जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता यावर आगरकरांनी टीका केली आहे. जातिभेदांची उपयोगिता संपली असून ते सामाजिक प्रगतीच्या आड येत असल्यामुळे क्रमशः ते नष्ट व्हावेत अशी अपेक्षा …